Ads

भूमी अभिलेख कार्यालयातील दोघांना5 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक

भद्रावती तालुका प्रतिनिधी :- भद्रावती शेतीची मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक व छाननी लिपीकाला 5 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभाग चंद्रपूर यांनी रंगेहात अटक केली. तक्रारदार हे चंद्रपूरभद्रावती तालुक्यातील मौजा चेक तिरवंजा येथे शेतीआहे. सदर शेतीची मोजणी करण्याच्या कामाकरिता तक्रारदार हे भूमी अभिलेख कार्यालय भद्रावती येथे
गेले होते.Two arrested for taking bribe of Rs 5,000

भूमी अभिलेख कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक 45 वर्षीय संजय भीमराव चांभारे व छाननी लिपिक 40 वर्षीय प्रशांत लीलाधर सोनकुसरे यांनी तक्रारदाराला शेती मोजणी करण्यासाठी 5 हजार रुपये मागितले. chandrapur trap पैसे देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार याने चंद्रपूर लाचलुचपत विभागाशी सम्पर्क साधत तक्रार नोंदवली, तक्रारीची पडताळणी झाल्यावर पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले यांनी सापळा रचला. 17 मे ला आरोपी यांना तक्रारदारातर्फे 5 हजार रुपये घेताना रंगेहात अटक करण्यात आली. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, ला. प्र. वि. नागपूर, मधूकर गीते, अप्पर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वी. नागपूर, अविनाश भामरे, पोलीस उप अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, ला.प्र. वि. चंद्रपूर यांच्या नेतृत्वात पो. हवा. अरुण हटवार, ना.पो. शी. रोशन चांदेकर, संदेश वाघमारे, म.पो.शी. पुष्पा काचोळे, चा.म.पो.कॉ. सिमा आंबेकर, सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांनी यशस्वीपणे पार पाडली.

सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी / कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
अॅन्टी करप्शन ब्युरो, चंद्रपूर दुरध्वनी 07172-250251श्री. अविनाश भामरे, पोलीस उपअधीक्षक, ला.प्र.वि. चंद्रपूर मो.क्र. 8888824599 पो.नी. जितेंद्र गुरनुले मो. क्र. 8888857184


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment