चंद्रपुर :-आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्याचा पाठपुरावा आणि प्रयत्नांनतर सिएसटीपीएस येथील नोंदणीकृत 101 सुरक्षा रक्षकांची नौकरीसाठी सुरु असलेली सहा वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे. या सर्व सुरक्षा रक्षकांना सिएसटीपीएसने पुर्ववत कामावर घेण्याचे आदेश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर आज मंगळवारी मुबंई येथील मंत्रालयात कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी अधिका-र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला आमदार किशोर जोरगेवार यांच्यासह कामगार प्रधान सचिव वनिता सिंघल, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कामगार उप सचिव श्रीकांत पुलकुंडवार, कामगार सह आयुक्त शिरीज लोखंडे, सहाय्यक कामगार आयुक्त जानकी बोहिते, चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता पंकज सपाटे, उपमुख्य अभियंता राजेश ओसवाल, वरिष्ठ व्यवस्थापक अ. पु. साळवे, संजय गायकवाड, बापूसाहेब जावडे आदिंची उपस्थिती होती. सदर बैठकीत या सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्यात यावे असे आदेश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित विभागाला दिले आहे.
चंद्रपूर सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाच्या मार्फत १०३ सुरक्षा रक्षकांची नोंदणी दिनांक 2015 मध्ये चंद्रपूर गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळ येथे पंजीकृत करण्यात आली होती. त्यानुसार १०३ सुरक्षा रक्षकांची चंद्रपूर गडचिरोली जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळात नोंद करण्यात आली. मात्र सदर नोंदणी अवैध असल्याचे सुरक्षा रक्षकांना सांगण्यात आले. त्यांनतर या विषयाला घेउन 2016 या वर्षी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि १०३ सुरक्षा रक्षक यांच्यामध्ये बैठक घेण्यात आली. या बैठकीत नोंदित १०३ सुरक्षा रक्षकांची नोंदणी वैध ठरविण्यात आली. त्यानंतर १०३ सुरक्षा रक्षकांची जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या कडुन मैदानी आणि शारीरीक चाचणी घेण्यात आली. परंतु नोंदित १०३ सुरक्षा रक्षकांची शारीरिक व मैदानी चाचणी अपरिहार्य तांत्रिक कारणामुळे पुढे ढकलण्यात येत असून पुढील चाचणी करिता तारीख लवकर देण्यात येईल असे संबधित विभागाकडून सुरक्षा रक्षकांना कळविण्यात आले. मात्र अद्यापही या संदर्भातील पूढील आदेश काढण्यात आलेला नाही. त्यामुळे परंतु एवढे वर्ष उलटूनही अजूनही १०३ सुरक्षा रक्षकांची शारीरिक व मैदानी चाचणी झालेली नाही. आता सदर सुरक्षा रक्षक बेरोजगार झालेले असून त्यांच्या कुंटुबावर उपसामारीचे वेळ आली आहेत. त्यामुळे याचा गांभिर्याने विचार करुन सदर सुरक्षा रक्षकांना कामावर घेण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. सदर मागणीच्या पुर्ततेसाठी शासनस्तरावर त्यांचा सातत्याने पाठपूरावा सुरु होता. अखेर आमदार किशोर जोरगेवार यांच्या मागणी नंतर या संदर्भात आज मुंबई येथील मंत्रालयात कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित विभागाच्या अधिका-र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असुन पात्र 101 सुरक्षा रक्षकांना कामावर पुर्ववत घेण्याचे आदेश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित विभागाच्या अधिका-र्यांना दिले आहे. त्यामुळे मागील 6 वर्षापासून प्रलंबित असलेला विषय मार्गी लागणार आहे.
0 comments:
Post a Comment