Ads

पवित्र दिक्षाभुमी येथे अभ्यासीकेसाठी 1 करोड रुपयांचा निधी मंजूर

चंद्रपुर :-चंद्रपूर येथील पवित्र दिक्षाभुमी येथे अभ्यासीकेसाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी एक करोड रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. या निधीतुन येथे सर्व सोयी सुविधायुक्त अभ्यासीका तयार केल्या जाणार आहे. सदर निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या पदाधिका-र्यांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेत त्यांचे आभार मानले आहे. यावेळी मेमोरिअल सोसायटीचे सहसचिव कुणाल घोटेकर, प्राचार्य डॉ. राजेश दहेगावकर, उपप्राचार्य डॉ. संजय बेले, प्रा. मनोज सोनटक्के, प्रा. दिलीप रामटेके आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर येथील पवित्र दिक्षाभुमीचा सर्वसमावेशक विकास व्हावा या करिता आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत. सदर दिक्षाभुमीचा विकास व्हावा या करिता पहिल्याच अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी एकत्रीत 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर या मागणीकरिता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान डाॅ. बाबासाहेबांच्या चरणस्पर्शाने पवित्र झालेल्या दिक्षाभुमी येथे सुसज्ज अभ्यासिका तयार करण्याचे आश्वासन आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले होते. आता या आश्वासनाची पूर्तता त्यांनी केली असून सदर अभ्यासिकेसाठी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. डाॅ. बाबा साहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत सदर निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून पवित्र दिक्षाभुमी येथे लवकरच अभ्यासिका साकारण्यात येणार आहे. सदर निधीतुन या अभ्यासिकेत पुस्तके, संगणक व इतर महत्वाच्या साधन सामग्री उपलब्ध करुन दिल्या जाणार आहे.
दरम्यान अभ्यासिकेला 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिल्या बद्दल डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीच्या पदाधिका-र्यांनी
कार्यालयात त्यांची भेट घेत आमदार किशोर जोरगेवार यांना पुष्पगुच्छ देत त्यांचे आभार मानले. दिक्षाभुमीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबध्द असुन आजवर दुर्लक्षित राहिलेल्या दिक्षाभुसाठी मोठा निधी उपलब्ध करुन देण्याच्या दिशेने माझा पाठपुरावा सुरु असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी सांगीतले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment