Ads

कुठे गेला विकास, शहर झाले भकास.. Where development has gone, the city has become Hell ..

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील जनतेला विकासाची स्वप्ने दाखवून महानगरपालिकेत सत्तेत आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी शहर भकास केले आहे. सत्ताधाऱ्यांकडून विकास केल्याचा दावा केला जात आहे. परंतु, शहरात त्यांनी केलेला विकास शोधूनही सापडत नाही. मागील पाच वर्षांत अनेक भ्रष्टाचाराचे आरोप या सत्ताधाऱ्यांवर आहेत. मनपातील भाजप सरकारच्या कार्यकाळातील शेवटच्या दिवशी शुक्रवारी (ता. २९) चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीने कस्तुरबा चौक येथे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर मनपासमोरील गांधी चौकात फटाके फोडून, पेढे वितरित करण्यात आले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०१७ मध्ये पार पडली. यावेळी भाजपच्या वतीने शहरातील नागरिकांना शहराचा विकास, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन अशी अनेक आश्वासने दिली होती. शहरातील मतदारांनी शहराचा विकास होईल, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन मिळेल, या आशेने भाजपला स्पष्ट बहुमत दिले. परंतु, सत्तेत आल्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांनी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले. केवळ स्वताचा विकास साधण्यावर पदाधिकाऱ्यांनी लक्ष दिले. त्यामुळे कोरोना काळात भोजन घोटाळा, कचरा संकलन टेंडर घोटाळा, प्रसिद्धी घोटाळा, रस्ते बांधकाम घोटाळा, शासकीय निधीचा दुरुपयोग, आझाद बगीचा सौंदर्यीकरण कामाच्या रकमेत वाढ असे अनेक प्रताप या सत्ताधाऱ्यांनी केले आहेत. शहरातील अनेक प्रभागात पाण्याची तीव्र टंचाई आहे. परंतु, अमृत योजना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात सत्ताधाऱ्यांना अपयश आले आहे. त्यामुळे आजही अनेक प्रभागातील नागरिकांना विहिरी, बोअरवेलच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.
मनपातील भ्रष्ट भाजप सरकारचा २९ एप्रिल हा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून मनपात प्रशासक बसणार आहे. मागील पाच वर्षांपासून शहराला लागलेले ग्रहण आजपासून सुटणार असल्याने काँग्रेसच्या वतीने आनंदोत्सव करण्यात येत असल्याचे मत चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी व्यक्त केले. यावेळी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी, युवक
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment