Ads

*नवोदय विद्यालयात असाही जपला जातो कृतज्ञतेचा वसा

वर्धा- शहरापासून सात किलोमीटर दूर सेलू काटे येथे वसलेले जवाहर नवोदय विद्यालय हे जिल्ह्यातील एकमेव केंद्रस्थापित विद्यालय आहे. येथे हजारो विद्यार्थी रोज ज्ञानार्जनाचे काम करतात. जिल्ह्यात अग्रग्रामी असलेल्या या विद्यालयाचे प्रत्येक वर्षी शेकडो विद्यार्थी देशात उच्चपदावर प्रतिनिधित्व करत असतात.
या विद्यालयातून शिकुन गेलेले विद्यार्थी आपले ऋण फेडायच्या हेतूने प्रत्येक वर्षी आपल्या लहान बहीण भावंडांना व गरजू इतर माजी विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यास तत्पर असतात, मग ती कुठल्याही क्षेत्रातील गरज असे मदत म्हणजे मदत.
हाच वसा घेऊन या वर्षी 1997 च्या बॅच ने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना पेन, लेखनप्याड देऊन व विद्यार्थ्यांना परिक्षेसंदर्भात योग्य ते मार्गदर्शन करून आपली कृतज्ञता जपली. या वर्षी 1997 च्या बॅच चे रोप्य महोत्सवी वर्षी आहे म्हणून पूर्ण वर्षभर ही बॅच विविध कार्यक्रम राबवून मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करत आहेत व वर्षअखेर याच बॅच कडून एक मोठा भव्य दिव्य रोप्य महोत्सवी सोहळा साजरा करण्याचा मानस आहे.
सोबत याच माजी विद्यार्थ्यांची एक नावा नावाची संघटना आहे या संघटनेद्वारे ही मुले समाजाप्रती पण आपली आपुलकी जपत असतात यात मागील कोरोना काळात यांनी 360 कुटुंबाना धान्य वाटप करून समाजातील गरजू लोकांचा आशीर्वाद मिळवला, नवोदय चा एक माजी विद्यार्थी हर्षल पाझारे याचे दुर्धर आजाराने निधन झाल्यावर त्याच्या कुटुंबाला अडीच लाखाची मदत केली, गरजू गरीब विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास करायला अडचण येताच त्यांना 15 मोबाईल वाटप करण्यात आले, गरजू गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी दोन लाख लोन देण्यात आले, ब्लड डोनेशन कॅम्प राबवून रक्तदान करणारे हेच ते नवोदय च्या मातीतील कृतज्ञतेचा वसा जोपासणारे विद्यार्थी आजही समाजासाठी नेहमी तत्पर असतात. यांना विद्यालयातील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले यांच्या कार्याची दखल घेऊन वर्धेचे माजी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांनी कौतुक केले होते.
यात प्रामुख्याने पंकज डोईफोडे, श्रीकांत खरडे, आदेश ढगे, नितीन डोंगरे, डॉ प्रशांत सावरकर, डॉ मिलिंद वासेकर, राहुल बोडखे, डॉ अमरदिप शानू (टेंभरे), निलेश बहादे यांचा पुढाकार असुन त्यांना नवोदय चे सर्व विद्यार्थी मदत करत असतात.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment