Ads

आयुक्ताच्या दालनात स्थायी समिती सदस्य पप्पू देशमूख यांचा ठिय्या

चंद्रपूर : मनपाच्या गुरुवारच्या अखेरच्या स्थायी समितीच्या सभेत स्थायी समितीचे सदस्य पप्पू देशमूख यांनी निवासी वापराच्या जागेमध्ये वाणिज्य वापर करीत दारू दुकान थाटल्याचा मुद्दा उपस्थित केला. यावर तातडीने कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी यांनी प्रशासनाला दिले. मात्र उपायुक्त अशोक गराटे यांनी कारवाई संदर्भात उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या स्थायी समिती सदस्य पप्पू देशमुख यांनी आयुक्तांच्या दालनातच ठिय्या मांडत जोपर्यंत कठोर कारवाई करत नाही तोपर्यंत उठणार नाही असा पवित्रा घेतल्याने मोठा गोंधळ उडाला.
शहरांमध्ये निवासी जागेत दारूच्या दुकानांना परवानगी देऊन त्याचा वाणिज्य वापर सर्रासपणे सुरू आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी मनपाच्या अधिकार क्षेत्रात घुसखोरी करत आहेत. दारू दुकानाचे स्थानांतरण करताना दारू दुकान अधिकृत असल्याचा दाखला मनपाकडून घेणे आवश्यक असतानाही राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाणीवपूर्वक या नियमाला बगल देण्याचे काम केले. त्यामुळे संपूर्ण शहरांमध्ये महानगरपालिकेच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण होत आहे. नागपूर व दाताळा रोडवरील दोन देशी दारू दुकानदारांना नोटीस देऊन वाणिज्य वापर थांबविण्याच्या सूचना मनपाने दिल्या होत्या. परंतु मनपाच्या सूचनेला केराची टोपली दाखवून नागपूर रोडवरील देशी दारू दुकानदाराने दुकान सुरू ठेवण्याची मंजुरी दिलेली आहे. अशाप्रकारे महानगरपालिकेचे अवमानना करून मुजोरी करणाऱ्यांना मनपा प्रशासनाने हिसका दाखवण्याची गरज असल्याची मागणी स्थायी समितीतील सर्व सदस्यांनी आज एकमुखाने व्यक्त केली. शहरातील नागरिकांचा विरोध असताना व नागरिकांना त्रास होईल अशा ठिकाणी दारूच्या दुकानांना सर्रासपणे परवानगी देण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभाग करीत आहे. त्यामुळे नागरिकांत मोठा असंतोष आहे. नागरिकांच्या भावनेची दखल घेऊन दोन्ही दारू दुकानाच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी गुरुवरच्या स्थायी समितीच्या बैठकीत केल्यानंतरही मनपा प्रशासनाने टोलवा-टोलवी केल्याने स्थायी समिती सदस्य पप्पू देशमुख यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या मांडला. जोपर्यंत या विषयाच्या बाबत कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका देशमुख यांनी घेतली होती.
स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी व 'आप'चा आंदोलनाला पाठिंबा
दरम्यान स्थायी समिती अध्यक्ष संदीप आवारी यांनी आयुक्त राजेश मोहिते दालनामध्ये येऊन नगरसेवक पप्पू देशमुख यांची भेट घेतली व आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला.आम आदमी पक्षाचे एका शिष्टमंडळाने सुद्धा देशमुख यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. शिष्टमंडळामध्ये आपचे जिल्हा कोषाध्यक्ष भीमराज सोनी, युवा जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार,संतोष बोपचे व सिकंदर सागोरे उपस्थित होते.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment