Ads

सखी सैय्या बहोत ही कमात है महंगाई डायन खाये जात है.

घुग्घुस :- केंद्रातील मोदी शासनाने
अच्छे दिनाचे गाजर दाखवून
देशातील जनतेची फसवणूक केली.
निवडणूक जवळ आले की पेट्रोल,डिझेल,स्वयंपाक इंधनाची दरवाढ थांबवली जाते व निवडणूक संपताच देशातील जनतेच्या खिश्यावर दरोडे टाकण्याचे काम मोदी सरकार करत आहे.
गेल्या सात दिवसात तब्बल सहा वेळा वाढ झाली आहे.
या महागाईने देशातील जनतेचे कंबरडे मोडले आहे.
दरवाढीच्या निषेधार्थ अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी,राहुल गांधी,प्रांताध्यक्ष नाना पटोले, पालकमंत्री विजय वड्डेटीवार, खासदार बाळु भाऊ धानोरकर,ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांच्या निर्देशानुसार घुग्घुस काँग्रेस कमिटी तर्फे शहर अध्यक्ष राजूरेड्डी, व कामगार नेते सैय्यद अनवर यांच्या नेतृत्वाखाली आज 01 एप्रिल रोजी गांधी चौक येथे दुपारी 12 वाजता गॅस सिलिंडर, दुचाकीना पुष्पहार घालून प्रदक्षिणा घालण्यात आली.
टाळ - मृदंग वाजवून मोदी शासन मुर्दाबाद च्या घोषणा देण्यात आल्या कार्यक्रमात उपस्थित महिलांनी सखी सैय्या बहोत ही कमात है महंगाई डायन खाये जात है या गाण्यावर ठेका धरून भजन कीर्तन केले.
आंदोलनात सौ.संगीता बोबडे,पुष्पा नक्षिणे,पदमा त्रिवेणी,दीपा बोकडे,यास्मिन सैय्यद,पुष्पा कणकम,मंगला बुरांडे,सरस्वती पाटील,अमिना बेगम,दुर्गा पाटील,संध्या मंडल,सरिता गौरकार,माधुरी ठाकरे,सरस्वती कोवे,गीता वांढरे,विद्या चौधरी,सुशीलाबाई अड्डुर, शांता ताई देठे,वैष्णवी दुर्योधन,सुशीला महाकाली,सुकना कणकम,शोभा देवतळे,मंगला जाधव,सपना रेगुंडवार,बालक्का कन्नूरी,कुंदा कोवे शमरावजी बोबडे, मुन्ना लोहानी,ब्रिजेश कुमार सिंग उत्तर भारतीय विभाग प्रदेश सचिव,सुरज कन्नूर युवा नेते,अलीम शेख,किशोर बोबडे,मोसीम शेख,शेखर तंगडपल्ली,अनिरुद्ध आवळे,इर्शाद कुरेशी, रोशन दंतालवार,शेख शम्मीउद्दीन,रोहित डाकूर,अनुप भंडारी,देव भंडारी,रफिक शेख,अरविंद चहांदे,जावेद कुरेशी,शहजाद शेख,अय्यूब कुरेशी,भैय्या भाई,बालकिशन कुळसंगे,संजय कोवे,जुबेर शेख,सुनील पाटील,कपिल गोगला,अमित सावरकर,वस्सी शेख, राजू तुरणकार, अम्मू शेख व मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment