Ads

पवन क्रीडा मैदान सुसज्ज करणार-आयुध निर्माणी चांदा महाप्रबंधक विजयकुमार

भद्रावती तालुका प्रतिनिधि :-
पवन क्रीडा मैदान आयुध निर्माणी चांदा येथे आयोजित करण्यात आलेल्या दिवस-रात्र कालीन क्रिकेट सामन्यांचे आयोजन खरोखरच आनंददायक होते .खेळाडूंनी उत्कृष्ट अशा खेळाचे प्रदर्शन केले .यापुढेही या मैदानावर विविध खेळांचे आयोजन मोठ्या प्रमाणात व्हावे यासाठी पवन क्रीडा मैदान अतिशय सुसज्ज करण्यात येईल अशी ग्वाही आयुध निर्माणी चांदाचे महाप्रबंधक विजय कुमार यांनी याप्रसंगी दिली.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त पवण क्रीडा मैदान आयुध निर्माणी चांदा येथे दिवस-रात्र कालीन टेनिस बॉल क्रिकेट चे आयोजन दिनांक 14 ते 27 एप्रिल दरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती स्नेहभोजन समिती आयुध निर्माणी चांदा तर्फे करण्यात आले. आठ वर्षापासून सातत्याने अशा प्रकारचे आयोजन करण्यात येत आहे.
आयुध निर्माणी चांदा सहित जिल्ह्यातील एकूण 60 संघांनी यामध्ये सहभाग घेतला. दि. 27 ला खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात विद्यार्थी क्रिकेट क्लब भद्रावती ने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर फायर ब्रिगेड आयुध निर्माणी चांदाने उपविजेतेपद पटकावले. तृतीय बक्षीस युनिट14 आयुध निर्माणी चांदा तर चौथे स्थान सर्वोत्तम क्रिकेट क्लब भद्रावती ने पटकावले.

सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिंदे यांचे तर्फे प्रथम बक्षीस पंधरा हजार रुपये व चषक, द्वितीय बक्षीस स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष रविंद्र शिंदे यांचे तर्फे बारा हजार रुपये रोख व चषक तर तिसरे बक्षीस डॉक्टर विवेक शिंदे यांच्या तर्फे रोख आठ हजार रुपये व चषक व स्नेहभोजन समितीतर्फे चौथे बक्षीस सहा हजार रुपये रोख व शील्ड देण्यात आले.

स्पर्धेतील मॅन ऑफ द मॅच चे बक्षीस सचिन ,मॅन ऑफ द सिरीज व बेस्ट बॅट्समन नवीन साहू, बेस्ट बॉलर अमोल रोडे यांना वैयक्तिक बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेचे उद्घाटन डॉ. विवेक शिंदे यांच्या हस्ते पार पडले. बक्षीस वितरण आयुध निर्माणी चांदा चे महाप्रबंधक विजयकुमार यांचे हस्ते पार पडले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शिंदे ,रवींद्र शिंदे, सचिन सरप टवार ,नकुल शिंदे, मुख्य आयोजक चंद्रकांत नागले, मनोज भोयर ,सतीश कवाडे, प्रदीप चरडे , सचिन सोरते, अंशू फुलझेले, शीतल वालदे इत्यादी उपस्थित होते. संचलन राम कुंडे तर प्रास्ताविक चंद्रकांत नागले यांनी केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment