Ads

कलकाम रिअल इन्फ्रा इस्टेट कंपनीच्या संचालक मंडळ व इतरांवर एम. पी. आय. डी. अंतर्गत गुन्हे दाखल करा

चंद्रपूर :-चंद्रपूर जिल्ह्यासह विदर्भात तब्बल १०० कोटींपेक्षा जास्त रुपयांनी गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या कलकाम रिअल इन्फ्रा (इं) लि. या कंपनीच्या संचालकांवर व त्यांना साथ देणाऱ्या गुंडावर एम.पी.आय.डी.
या कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा on the Board of Directors of Kalkam Real Infra Estate Company and others File internal offenses under MPID Act व गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये त्यांना मिळवून द्यावे अशी मागणी कलकाम कंपनीच्या विरोधात जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून कलकाम कंपनीच्या एजंट व गुंतवणूकदार असलेल्या रत्नमाला संजय चहारे, वय ४२ वर्षे, राहणार राह. गडचांदूर ता. कोरपना जि. चंद्रपूर सौ. मंगला सुनिल लोणारे, वय ४५ वर्षे राहणार नांदाफाटा यांनी सर्व गुंतवणूकदारांच्या वतीने केली आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटल्या गेले की सन २०१३ पासुन कलकाम रिअल इस्टेट कंपनी मध्ये रु.१ लाखापासून तर रु.१० १० लाखापर्यंत गुंतवणूक केली असून ठरलेल्या मुदतीत आम्हास मुद्दलसह व्याजाची रक्कम देण्यास मागील सन २०१९ पासून विष्णू पांडूरंग दळवी, सि.एम.डी. कलकाम रिअल इन्फा (इं) लि. मुंबई विजय सुपेकर (डेव्हलपमेंट डायरेक्टर) मुंबई. सुनिल वांद्रे (डेव्हलपमेंट डायरेक्टर) मुंबई. मुंबई) अनिल पासवान विदर्भ युनिट प्रभारी कलकाम (रा. ५) महमद इदरीस विदर्भ युनिट प्रभारी कलकाम (रा. मुंबई) विजय वासुदेव येरगुडे विदर्भ प्रभारी रा. चंद्रपूर विदेश प्रभाकर रामटेके विदर्भ प्रभारी रा. चंद्रपूर किसन मोतीराम पेंदोर रा. राजूरा हे टाळाटाळ करत आहे. या संदर्भात गुंतवणूकदारांनी कंपनीच्या विदर्भ प्रभार असलेल्या विजय वासुदेव येरगुडे व विदेश प्रभाकर रामटेके यांच्याशी संपर्क साधून पैशाची मागणी केली असता वेळोवेळी त्यांनी गुंड प्रव्रुतिच्या भरत गुप्ता व प्रतिभा ठाकूर यांना बोलावून गुंतवणूकदारावर दबाव टाकण्याचा व त्यांच्या कडून गुंतवणूकदारांना धमकी देण्याचा प्रयत्न केला आहे. व मुंबई येथील कंपनीच्या संचालकांना मेटण्यास गेलो असता तिथे सुद्धा केवळ कागदावर पैसे देत असल्याचे लिहून देऊन सुद्धा मागील तीन वर्षापासून गुंतवणूकदारांचे आर्थिक शोषण सुरू आहे.

कलका कंपनीच्या संचालकांनी गुंतवणूकदारांच्या ठेवी मुदत संपल्यानंतर सुद्धा परत केल्या नाही तर उलट कंपनीच्या येरगुडे व रामटेके यांच्या संरक्षणासाठी भरत गुप्ता व प्रतिभा ठाकूर यांना सोबत ठेऊन गुंतवणूकदारांना धमक्या देणे सुरु आहे. दरम्यान कंपनीचे एजंट यांच्याकडे गुंतवणूकदार पैशाचा तगादा लावत असल्याने एजंट गणेश कविटकर व रतन रामटेके यांचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी मृत्यु झाला व अनेक ठेवीदारांचे सुद्धा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यु झाले, असे किती दिवस हे प्रकरण चालणार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे, बाळा नांदगावकर नंदू घाडी यांच्यासह मुंबई चे मनसे पदाधिकारी संजय जाधव, कुणाल सूर्यवंशी, सुधीर खापने इत्यादीकडे गेलो असता त्यांनी गुंतवणूकदारांना पैसे मिळावे म्हणून कंपनीच्या सर्व संचालकांकडे संपर्क केला पण ते सर्व संचालक त्यांच्या समोर आले नाही, त्यामुळे मुंबई येथील पोलीस स्टेशन मधे संपर्क केला तर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यात तक्रार करा आम्ही इकडे मग चौकशी करून त्यांना अटक करतो असे सांगितले त्यामुळे कलकाम कंपनीच्या सर्व गुंतवणूकदारांच्या वतीने रत्नमाला संजय चहारे, व मंगला सुनिल लोणारे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक साळवे यांच्याकडे तक्रार केली असून हे प्रकरण गडचांदूर पोलीस स्टेशन मधे पाठविण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी एम.पी.आय.डी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावा अन्यथा चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ व नागपूर जिल्ह्यातील सर्व गुंतवणूकदार हे आमरण उपोषण करेल असा इशारा गुंतवणूकदारांनी पत्रकारपरिषद घेऊन पोलीस प्रशासनाला दिला आहे. यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांच्यासह कलकाम कंपनीचे एजंट रत्नमाला चहारे. मंगला लोनारे, पायल तेलंग, रत्नमाला गायकवाड, विनोद काळे, छत्रपाल निषाद, सचिन नाकाडे, रवी सोरते, संदीप पन्दरे, मेघाराणी खंडाले, संगीता गोरडवार विलास घोटकर. प्रतिभा गौरकर, उत्तम उपरे इत्यादींची उपस्थिती होती.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment