Ads

खासदारांनी पदाच्या अहंकाराऐवजी गरीमा जोपासावी - हंसराज अहीर

चंद्रपूर - चंदपूर जिल्ह्याच्या खासदारांनी भद्रावती येथील विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या व्यवस्थापकाशी गैरवर्तणूक केल्याने पोलिसांनी त्यांचेवर गुन्ह्याची नोंद केल्याचे कळते. सदर प्रकार हा लोकशाही मुल्यांना पायदळी तुडविणारा आहे. एका कनिष्ठ कर्मचाऱ्यावर लोकप्रतिनिधकडून हल्ला, शिविगाळ व धमकीसारखा प्रकार निषेधार्ह असून निंदास्पद आहे असे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.MPs should cultivate dignity instead of ego - Hansraj Ahir
लोकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीकडून अशाप्रकारच्या वर्तणूकीची अजिबात अपेक्षा नाही. पदाच्या अहंकाराऐवजी पदाची गरीमा जोपासावी तसेच सार्वजनिक कार्यातून हेे दाखविण्याऐवजी एका कनिष्ठ कर्मचाऱ्यास धमकी देण्यात स्वारस्यमानणाऱ्या वृत्तीचा सर्व स्तरीय निषेध होणे गरजेचे असल्याचेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment