Ads

सिमेंट काँक्रीट रोडच्या कामाची चौकशी करा

सावली तालुका प्रतिनिधी:-

तालुक्यातील जीबगाव ग्रामपंचायत येथे जिल्हा विकास निधी अंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम सुरू आहे. सदर कामाचे वर्क ऑर्डर ग्रामपंचायतला प्राप्त झाले नसतानाही विनापरवानगी काम सुरू असल्याचा आरोप जीबगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य राकेश गोल्लेपल्लीवार यांनी केला आहे. विनापरवानगी ने सुरू होत असलेल्या रस्त्याच्या कामाचे सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी सुद्धा निवेदनाद्वारे संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.
परतु आज आठ दिवसाचा कालावधी लोटुन ही कामाजी चौकशी करण्यात आली नसल्याने जिल्हा निधीतील सी सी रोड बाधकाम पुर्ण झाले असल्याने अधिकारी यांना सुध्दा या भ्रष्टराला दुजोरा देत असल्याचे दिसुन येत आहेत जीबगाव ग्रामपंचायत अंतर्गत निळू कीनेकर ते मेन रोड व गंगाधर भोयर ते प्रकाश देठे यांचे घरापर्यंत सिमेंट काँक्रिट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. सदर काम हे सरपंच, सचिव व कंत्राटदारांच्या संगनमताने सुरू आहे. या कामाचे वर्क ऑर्डर ग्रामपंचायत कडे उपलब्ध नसतांना कामाची सुरुवात कशी काय केली ? असा आरोप निवेदनात करण्यात आलेला आहे. विनापरवानगी ने सुरू असलेल्या कामाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


सदर कामाबाबत ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये कोणतेही प्रस्ताव न ठेवता सदस्य यांना माहीती न देता विना परवानगीने कामास सुरुवात करण्यात आली त्यामुळे मनमर्जीने काम सुरू असून निकृष्ट दर्जाचे होत आहे. याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आठ दिवसा आधी संर्वग विकास अधिकरी यांचे केले असताना मात्र निवेदनाकडे दुर्लक्ष होताना दिसुन येत आहे
- राकेश गोल्लेपल्लीवार सदस्य ग्रामपंचायत जीबगाव
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment