Ads

पवित्र नात्यालाच काळीमा फासणा-या बापाच अशोभनीय कृत्य

भद्रावती तालुका प्रतिनिधी - लहान बाळांचा जन्म ते तारुण्याचा प्रवास, व लग्न मात्र आपल्या पोटच्या मुलीवर वासनांध बापाने अशोभनीय कृत्यAn indecent act by a father who tarnishes a sacred relationship केल्याने नागरिक चांगलेच संतापले आहे.
पित्याने आपल्या पोटच्या विवाहित मुलीचा विनयभंग करून पवित्र नात्यालाच काळीमा फासणा-या 53 वर्षीय पित्यास मुलीच्या तक्रारीवरून भद्रावती पोलिसांनी अटक केली आहे. Sexual abuse

प्राप्त माहितीनुसार पिडीत मुलगी ही विवाहित असून तिचे सासरच्या मंडळींशी पटत नसल्याने ती पतीला सोडून जवळपास मागील 10 महिन्यांपासून आपल्या आई-वडीलांकडे आली होती. याच दरम्यान प्रबळ वासनेच्या आहारी गेलेल्या आरोपी वडीलाने पोटच्या मुलीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला. या घटनेनंतर पिडीत मुलीने याबाबत भद्रावती पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. याआधारे पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे. पुढील तपास भद्रावती पोलिस करीत आहे.
प्रतिनिधी
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment