Ads

माता महाकाली यात्रेसाठी चंद्रपूरात दाखल होत असलेल्या भाविकांच्या सोयी सुविधेत वाढ करा - आ. किशोर जोरगेवार

चंद्रपुर :-चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीच्या यात्रेसाठी चंद्रपूरात दाखल होत असलेल्या भाविकांची उत्तम व्यवस्था करणे आपली जबाबदारी आहे. त्यामूळे भाविकांची गैरसोय होणार नाही या दिशेने उपाययोजना करत त्यांच्यासाठी महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या सोयी सुविधेत वाढ करण्याची गरज आहे. येत्या एक दोन दिवसात भाविकांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे पुर्व तयारी करत येथील सोयी सुविधेत वाढ करण्याच्या सुचना आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा आयुक्त राजेश मोहीते यांना केल्या आहे.
आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिसराची पाहणी करत येथील सोयी सुविधांचा आढावा घेतला. यावेळी मनपा आयुक्त राजेश मोहिते, सफाई विभागाचे संतोष गर्गेलवार, यंग चांदा ब्रिगेडचे राशेद हुसेन, विश्वजित शाहा, यांच्यासह मनपा अधिका-र्यांची उपस्थिती होती.

चैत्र महिन्यात भरणा-या महाकाली यात्रेला राम नवमी पासुन सुरवात झाली आहे. या यात्रेसाठी राज्यासह राज्याबाहेरील भक्त मोठ्या संख्येने चंद्रपूरात दाखल होत आहे. या भक्तांसाठी महानगर पालिकेच्या वतीने सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहे. दरम्यान आज मंगळवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी यात्रेतील सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी यात्रेकरुंसाठी महानगर पालिकेच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या आरोग्य केंद्रालाचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली. येथे बेडची व्यवस्था नसल्याने उष्मघाताच्या रुग्णांसाठी तात्काळ दोन बेड उपलब्ध करण्याच्या सुचना यावेळी त्यांनी केल्या. चंद्रपूरातील तपती उण लक्षात घेता भाविकांसाठी मुबलक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, येत्या एक दोन दिवसात भाविकांची वाढणार असलेली संख्या लक्षात घेता त्यांच्या राहण्यासाठी उभारण्यात आलेला पेंडाल वाढविण्यात यावा, मंदिर परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकी जवळ स्वच्छता करत तेथेही भाविकांच्या राहण्याची सोय करण्यात यावी, परिसरात स्वच्छता ठेवण्यात यावी, भार नियमन सुरु असल्याने यात्रेच्या ठिकाणी पर्यायी सोय म्हणून जनरेटरची व्यवस्था करण्यात यावी, यात्रेकरिता सुरु करण्यात आलेल्या पोलिस चौकीतील पोलिसांसाठी मनपा प्रशासनाने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, आदि सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला केल्या आहेत. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिरसात लावण्यात सिसिटिव्हीचीही पाहणी करत याबाबत मंदिर ट्रस्टकडून माहिती जाणून घेतली. यावेळी आ. जोरगेवार यांनी येथील पोलिस चौकीलाही भेट देत पोलिसांच्या अडचणी समजून घेतल्या. मागील अनेक वर्षापासून यात्रेच्या व्यवस्थेत पोलिस प्रशासन उत्तम काम करत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment