Ads

आदिवासी विविध कार्यकारी सह. संस्थेच्या सभापती व उपसभापती ची निवडणूक पार पडली

भद्रावति तालुका प्रतिनिधी:-
भद्रावती तालुक्यातील मौजा चंदनखेडा येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चंदनखेडा पंचवार्षिक निवडनुक दिनांक १०/०४/२०२२ रोजी घेण्यात आली होती. या निवडणुकीत कांग्रेस समर्पित श्री. सुधीर मुडेवार, श्रीमती वनिताताई जांभुळे, श्री, भानुदासजी गायकवाड, श्री, अनिल चौधरी यांच्या मार्गदर्शनात लढविलेल्या शेतकरी विकास प्यानल चे १३ पैकी १३ संचालक निवडणुकीत निवडून आले. नवनिर्वाचित संचालक मधुन आज दिनांक २९/०४/२०२२ रोजी सभापती उपसभापती ची निवडणूक घेण्यात आली त्या निवडणुकीत श्री. भारत सखाराम जीवतोडे यांची सभापती पदी बिनविरोध निवड करण्यात आली तर उपसभापती पदी श्री सुमित पुरुषोत्तम मुडेवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली सदर निवडणुकी नंतर नवनिर्वाचित सभापती उपसभापती व संचालकाचे स्वागत करून शुभेच्या देण्यात आल्या या वेळी चंदनखेडा ग्रामपंचायत चे सरपंच श्री नयन बाबाराव जांभुळे , सामाजिक कार्यकर्ता श्री सुधीर मुडेवार , श्री भानुदासजी गायकवाड, श्री अनिल चौधरी उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment