Ads

गरजू महिलांना शिवणयंत्राचे वितरण ..

चंद्रपुर :- ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीशी एकनिष्ठठता जोपासणे हा प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य ठरते या भावनेतून सिंगापूर येथे वास्तव्यात असलेल्या भारतीय युवा बुद्धिस्ट मित्रपरिवार दरवर्षीनिवडक गरजवतांना पुनर्वसन साहित्य पूरवठा करतात. यावर्षी चंद्रपुरातील विकलांग सेवा संस्थेद्वारा 2 गरजू महिलांना 2 शिवणयंत्र व 1 आनंदनवन निर्मित 3 चाकी सायकलसाठी पाठविलेल्या निधीतून वर्षा कोठेकर यांच्या शुभहस्ते शिवणयंत्र व सायकल प्रदान करण्यात आले.तसेच हरियाणा राज्यात फ्रेंच बॉक्सिंग स्पर्धेत प्राविण्य पदके पटकविणाऱ्या चंद्रपुर जिल्ह्यातील युवा टीमचा विशेष मिठाई व गुणगौरव करून कौतुक करण्यात आले. चंद्रपुरातील विविध क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या व अलीकडेच राष्ट्रीय क्रीडास्पर्धेत चंद्रपुरचे नाव चमकवविणाऱ्या अलका मोटघरे यांचा शाल श्रीफळ पुष्पगुछ देऊन भावपूर्ण सत्कार करण्यात आला.
Distribution of sewing machines to needy women
स्थानिक विकलांग सेवा संस्था संचलित तुकुम येथील शिवभोजन थाळी वितरण केंद्रात सम्पन्न झालेल्या या विधायक उपक्रमाला प्रा दूष्यन्त नगराळे,कोच श्री रामटेके, रवी चव्हाण ,प्रणाली गुरपुडे मदतीचा हात संस्था ,पूजा पान्हेरकर इत्यादींची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमात स्वागत गीत अनु मेश्राम यांनी मधुर सादरीकरण केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवराव कोंडेकर,अशोक खाड़े ,प्रसाद पा न्हेरकर, श्री नितिन व सौ आरती पाटील यांनी सहकार्य केले.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment