Ads

मनपाचा लेबर पेमेंट घोटाळा जिल्हाधिकारी व कामगार आयुक्तांच्या दालनात

चंद्रपूर : जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष नगरसेवक पप्पू देशमुख यांनी मागील स्थायी समितीच्या बैठकीमध्ये चंद्रपूर मनपाचा लेबर पेमेंट घोटाळा उघडकीस आणला होता. या प्रकरणाची तक्रार नगरसेवक देशमुख यांनी जिल्हाधिकारी व कामगार आयुक्तांकडे पुराव्यासहित करीत आरोपींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
त्यामुळे आता मनपाचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मनपाच्या आरोग्य, स्वच्छता, यांत्रिकी, पाणी पुरवठा, अग्निशमन आदी विभागामध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या पगारातून ॲडव्हान्सच्या नावाखाली दर महिन्याला तीन ते पाच हजार रुपये कपात करण्यात येते. तसेच त्यांच्याकडून बळजबरीने स्वाक्षरी घेण्यात येते असा आरोप नगरसेवक देशमुख यांनी केला होता.
मनपामध्ये मे. लिमरा नावाच्या एजन्सीने शुन्य टक्के नफा टाकून कंत्राट मिळविले होते. शून्य टक्के नफा लिहून कंत्राटी कामगारांना किमान वेतन देणे शक्य नसल्याने देशमुख यांनी स्थायी समितीमध्ये या निविदांना विरोध केला होता. परंतु सत्ताधारी पक्षाने बहुमताच्या जोरावर हा चुकीचा मुद्दा पात्र ठरविला. विशेष म्हणजे मेसर्स लिमरा एजन्सीकडे यापूर्वीच आरोग्य विभागात कंत्राटी कर्मचारी पुरविण्याचे काम देण्यात आले आहे. आरोग्य विभागातील कंत्राटी कामगारांच्या पगाराबाबत एजन्सीने दिलेले वेतन चिठ्ठ्या व बँक खाते बुकाची प्रत देशमुख यांनी मनपा प्रशासनाला मागितली. मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनचिठ्ठ्यांची व बॅक खातेबुकाची प्रत उपलब्ध नसल्याचे लेखी उत्तर देशमुख यांना देण्यात आले.
लेबरच्या पेमेंटमधून अशा पद्धतीने दरवर्षाला करोडो रुपयांची अवैध वसुली करण्यात येते असा, आरोप करून देशमुख यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी व कामगार आयुक्ताकडे करीत दोषी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारीसोबत त्यांनी शेकडो कामगारांच्या वेतन चिठ्ठ्या पुरावे म्हणून जोडल्या आहेत. यावेळी जनविकास सेनेचे आकाश लोंढे, अमोल घोडमारे, अनिल कोयचाळे उपस्थित होते .


Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment