Ads

मुख्याधिकारी झाले अभिन्यास मालक नगरसेवकाचे पाठराखणदार

ब्रह्मपुरी:-स्थानिक गजानन नगरीतील 15 मीटर डी. पी. रोडच्या तक्रारीचा न्यायनिवाडा करतांना ब्रह्मपुरी न.प. चे मुख्याधिकारी अभिन्यासाचे मालक नगरसेवक सतीश हुमने व भागीदार तौफिक पठाण यांचे पाठराखणदार झाल्याचे त्यांचे दिनांक 5/4/2022 ला तक्रारदार गजानन नगरी कृती समितीला दिलेल्या पत्रावरून दिसून येत आहे.
दिनांक 25/3/2022 गजानन नगरी कृती समितीने नगर परिषद विकास आराखड्यातील मंजूर असलेला 15 मीटर डी. पी. रोडच्या गट न.403/1,403/2, 404/3 मधून जाणाऱ्या सदर डी. पी. रोडला मोका स्थितीवर गट.न. 404/1अ, ब, क मधील भूखंड क्र. 1 व 2 अडथळा ठरून वाहतुकीला अडचण निर्माण झाल्याने 15 मीटरचा डी. पी. रोड वाहतुकीला खुला करण्याची विनंती वजा तक्रार मुख्याधिकारी न.प. ब्रह्मपुरी यांचेकडे केली होती.
तक्रारीच्या अनुषंगाने मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी दिनांक 4/4/2022 ला थातुरमातुर मोका चौकशी करीत नगरसेवक सतीश हुमने व भागीदार तौफिक पठाण यांनी 2020-21 मध्ये निवासी प्रयोजनाकरिता विकसित केलेला अभिन्यासाला बरोबर ठरवीत अभिन्यासातील भूखंड क्र.1 व 2 डी. पी. रोडला अडथळा ठरत नसल्याचा न्यायनिवाडा दिला व परिसरातील अभिन्यासाची मोजणी करून क प्रत सादर करण्याचा सल्ला कृती समितीला दिनांक 5/4/2022 ला दिलेल्या पत्रातून दिला आहे. सदर पत्रानुसार अंदाजे 2007, 2008, 2009 मध्ये मंजूर अभिन्यासांना मुख्याधिकारी वासेकर यांनी चुकीचे ठरविले आहे. त्यामुळे गजानन नगरी राहिवाश्यामध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
वास्तविकता 2020-21 मध्ये गट न.404/1अ, ब,क, च्या जागेत रहिवासी कामाकरिता विकसित करतांना सदर गट न.च्या पूर्व व पच्छिमे कडील पूर्वीच्या मंजूर अभिन्यासातील 15 मीटरच्या डी. पी. रोडला समांतर डी.पी. रोड टाकणे आवश्यक होते. मात्र, याकडे अभिन्यास मालक सतीश हुमने भागीदार तौफिक पठाण, उपअधीक्षक भूमी अभिलेख ब्रह्मपुरी, नगर रचनाकार चंद्रपूर व मुख्याधिकारी न.प.ब्रह्मपुरी यांनी दुर्लक्ष केल्याचे मोका स्थितीवर सीमांकन नसलेल्या अस्पष्ट 15 मीटरच्या डी.पी. रोडवरून दिसून येते.
सदर सीमांकन नसलेल्या व अविकसित असलेल्या डी. पी. रोडच्या लगत असलेल्या
महसूल विभागाच्या गट.क्र.403/2मधील भूखंड क्र. 10 चे
धारक मोहूर्ले यांचे व नगरसेवक हुमने व पठाण यांच्या गट न.404/1अ, ब,क च्या अभिन्यासातील भूखंड क्र. 1 डॉ. प्रीती सावजी व भूखंड क्रमांक 2 डॉ.पर्वते यांचे अंशतः अतिक्रमण दिसून येत आहे असा गजानन नगरी कृती समितीचा समज आहे. त्यामुळे डी.पी.रोडचे सीमांकन करून असलेले अतिक्रमण काढून डी. पी.रोड विकसित करून वाहतुकीला खुले करावे अशी मागणी कृती समितीने मोका चौकशीकरिता आलेले मुख्याधिकारी श्री. वासेकर यांचेकडे दिनांक 4/4/2022ला केली होती मात्र, ती मागणी मुख्याधिकारी वासेकर यांनी त्यांनी दिनांक 5/4/2022 ला कृती समितीला दिलेला पत्रातून धुडकावून लावली आहे.
2020-21 मधील गट क्र.404/1अ, ब,क, च्या जमिनीचे अकृषक आदेशाप्रमाणे मंजूर अभिनासाचे विकासाकरिता रस्ते,नाली व वीज यांची उपलब्धता करून देणे आवश्यक होते त्याकरिता अभिन्यासातील भूखंड क्र.1 व 3 न.प.ने तारण ठेवले होते. मात्र अपूर्ण नाली व खडीकरण केलेला अपूर्ण डी. पी. रोड, तसेच उत्तरेकडील असलेले पूर्व-पच्छिम रोडवर केवळ मुरूम व माती टाकून केलेला कच्चा रोड याव्यतिरिक्त कोणताही अभिन्यासाचा विकास न करता अभिन्यास मालकांना तारण असलेले भूखंड विक्रीची परवानगी मुख्याधिकारी न.प. ब्रह्मपुरी यांनी देऊन नगरसेवक असलेल्या अभिन्यास मालकाला अभिन्यास विकसित न करण्यास सहकार्य केले आहे. अभिन्यास मालकांना अभिन्यासात आवश्यक सोयी सुविधा न करता तेथील भूखंड विक्रीचा परवानगी दिली जात असेल अशा अभिन्यासाचा विकास कोणी करावा असा संतप्त सवाल नागरिक करीत आहेत.
गजानन नगरीतील डी. पी.रोड व नव्याने टाकलेल्या अभिन्यासाच्या विकासाबाबत योग्य निर्णय न घेतल्यास गजानन नगरी कृती समिती अभिन्यासाचे मालक, ब्रह्मपुरी न.प.प्रशासन, उपअधीक्षक भूमी अभिलेख ब्रह्मपुरी, नगर रचनाकार चंद्रपूर यांच्याविरुद्ध आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment