Ads

पैश्याच्या वादात तंटामुक्त समिती अध्यक्षाची हत्या

चंद्रपुर :-दिनांक २३/०४/२०२२ रोजी पो.स्टे. शेगांव येथे फिर्यादी नामे नितीन बबनराव घोडमारे वय ३४ वर्षे रा. गांव यांनी तोडी रिपोर्ट दिला की, दि. २१/०४/२०२२ रोजी त्याचा लहान भाऊ महेश बबनराव घोडमारे वय २५ वर्षे रा. शेगाव हा त्यांचे गावातील स्वप्नील दयाकर चौधरी याचे मोटार सायकलवर गेला. तेव्हा पासून घरी आला नाही त्याचा शोध घेत असता त्यांना मिळालेल्या खबरे वरून त्यांनी मौजा मेसा गावाजवळील जंगल शिवारात गोध घेतला असता त्यांचा भाऊ महेश बबनराव घोडमारे वय २५ वर्षे रा. शेगांव याचा मृतदेह दिसून आला मृतकाचे डोक्याला मार, चप्पत अस्ताव्यस्त स्थीतीत, रक्ताने माखलेले गोटे, त्याचे चेहऱ्यावर डोक्यावर मार व बाजुचे झुडपात कप स्टील रॉड अशा संशयास्पद स्थितीत मृतदेह दिसून आला व त्याचा भावास कोणीतरी अज्ञात इसमाने जिवानीशी ठार मारले अशा फिर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे. गांव येथे पो.स्टे. शेगांव येथे अप क्र. ११६/२०२२ कलम ३०२ भा.द.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला..Assassination of a dispute-free committee chairman over a money dispute
सदर गुन्हयाची माहीती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खांडे यांचे मार्गदर्शनात स.पो.नि. संदीप कापडे, स.पो.नि. मंगेश भोयर, पो.उपनि अतुल कावळे हे त्यांचे पथकासह घटनास्थळी दाखल झाले गुन्हयाची माहीती घेतली. मयता बाबत बारकाईने माहिती घेवून मुखबीरचे खात्रीशीर खबरे वरून व तांत्रीक तपासाचे आधारे आरोपीचे नाव नि पन्न करण्यात आले. आरोपी नामे स्वप्नील दयाकर चौधरी वय १९ वर्षे रा. शेगांव जिचंद्रपूर यास ताब्यात घेवून त्यास गुन्हयासबंधाने विश्वासात घेवून विचारपूस केली असता त्याने जुन्या वादावरून त्याचे साथीदार विधीसंघर्षैग्रस्त बालकासह खुनाची कबुली दिली. सदर आरोपी विधीसंघर्षे बालक व गुन्हयात वापरलेलो मोटार सायकल पुढील कार्यवाहीस शेगांव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले. पुढील तपास पो.स्टे. शेगांव चे अधिकारी करीत आहे.

सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अरविंद साळवे, अपर पोलीस अधिक्षक श्री अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक श्री. बाळासाहेब खाडे, स्थानिक गुन्हे शाखा यांचे निर्देशाप्रमाणे स.पो.नि. जितेंद बोबडे, संदीप कापडे, मंगेश भोयर, पो. उपनि अतुल कावळे स. फौ. खनके, पो. हवा. संजय आतंकुलवार, स्वामी चालेकर, प्रकाश बल्की, महोतो ना.पो.कॉ. सुभाष गोहोकार, चंदू नागरे, पो.कॉ. संदीप मुळे, प्रशांत नागोसे, गणेश भोयर, सतिश बगमारे, प्रांजल झिलपे, रविंद्र पंधरे, प्रमोद कोटनाके, गणेश मोहूर्ले, विनोद जाधव, पो.स्टे गांव येथील स.पो.नि. अविनाश मेश्राम, स.फौ. किशोर पिरले, अशोक क्षिरसागर, पो. कॉ. देवानंद डुकरे, रमेश पाटील यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment