Ads

रिंगरोड रद्द केल्याबद्दल आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे निर्माण नगर वासीयांनी मानले आभार

चंद्रपुर :- चंद्रपूर शहराच्या उत्तर बाजूला ट्रॉयस्टार हॉटेल पासून ताडोबा लॉ कॉलेज मूल रोड पर्यंत ६० मीटर रुंदीचा सुमारे ५ किमी. लांबीचा विकास योजना रस्ता विकास आराखड्यातून वगळून त्याखालील जागा निवासी विभागात समाविष्ट करण्यात आल्यामुळे निर्माण नगर भागातील जवळपास ७०० निवासी लोकांना अभय मिळाले आहे. या निर्णयामुळे निर्माण नगर वार्डातील लोकांनी माजी अर्थमंत्री सुधीर आमदार सुधीर मुनगंटीवार, नानाभाऊ , नानाभाऊ शामकुळे, महापौर राखीताई कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, सभापति संदीप आवारी, नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेवक मायाताई उईके, नगरसेवक शिलाताई चव्हाण यांचे शतहाः आभार मानले आहे.
ट्रायस्टार हॉटेल पासून ताडोबा लॉ कॉलेज ते मूल रोडपर्यंत ६० मीटर रुंदीचा सुमारे ५. किमी. लांबीचा विकास योजना रस्ता विकास आराखड्यातून वगळून त्या खालील जागा निवासी विभागात समाविष्ट करण्याचा आदेश नगरविकास विभागाने गेल्या आठवड्यातच जारी केली आहे.

निर्माण नगर वार्डातील निवासी लोकांच्या परिसरातून ६० मीटर रुंदीचा सुमारे ५ किमी लांबीचा रस्ता रद्द करण्यासाठी रिंगरोड विरोधी समिती चे अध्यक्ष वसंतराव धनरे व सर्व समिती सदस्य हे वॉर्डातील नगरसेवक, महापौर व उपमहापौर व सभापति यांच्या सतत संपर्कात होते त्यांच्या मागणीनुसार माजी अर्थमंत्री व आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पाठपुरण्याने रिंग रोड रद्द करण्यात यश मिळाले व 700 नागरिकांच्या निवासाचा प्रश्न सुटला.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment