Ads

काळ्या तोंडी माकडाच्या पिल्लूचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.

भद्रावति तालुका प्रतिनिधि:-
माजरी येथील वॉर्ड क्रमांक चार येथील राधाकृष्ण मंदिरातील पिंपळाच्या झाडात काळ्या तोंडाच्या माकडांचा रोजच धुमाकूळ सुरू असतानाच आज सकाळी सहा वाजता पिंपळाच्या झाडा च्या बाजूने गेलेल्या विजेच्या खांबाजवळ विजेचा धक्का लागून एका माकडाच्या पिल्लाचा मृत्यू झाला. आणि विजेच्या खांबामध्ये हात विद्युत तारेला लटकला होता. सर्व माकडे शांतपणे त्याच्याभोवती शोक करत बसली होती. त्या राधाकृष्ण मंदिराजवळून कोणी गेल्यास त्याच्या अंगणात माकडे चढत होती त्यामुळे लोकांना ये-जा करताना त्रास होत होता. या घटनेची माहिती वार्डतील लोकांनी भद्रावतीच्या वन अधीक्षकांना दिली.
वन अधिकारीनी विद्युत विभागाशी संपर्क साधून विद्युत खांबाचा वीजपुरवठा खंडित करण्यास सांगितले. माकडांच्या कळपामुळे वनविभागाला खूप प्रयत्न करावे लागले आणि कसेबसे मृत माकडाची पिल्ले खंबेतुन काढण्यात यश आले. वन कर्मचारी परिक्षेत्र अधिकारी भद्रावती चे एचपी शेंडे यांनी सांगितले की, मृतक माकळाचे पिल्लू तीन ते चार महिन्यांचे आहे. घटनेचा पंचनामा करून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.रोडे यांच्या उपस्थितीत माकडावर दफन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. वनपरिक्षेत्र अधिकारी भद्रावती चे एच पी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र सहाय्यक एम बी हनवते भद्रावती, बिट वनरक्षक डी एम गेडाम भद्रावती, वनमजूर यांनी यशस्वी कारवाई केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment