Ads

शेगाव येथील तंटा मुक्त समिती अध्यक्षाचा खूण

शेगाव (बू) : स्थानिक शेगाव (बू) येथील युवक समाज सेवा करणारा तसेच महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती शेगाव बू चे अध्यक्ष कू महेश बबनराव घोडमारे वय वर्षे ३० याचा खूण झाला असल्याची माहिती आज सकाळी ११ वाजताच्या सुमारास उधडकिस आली आहे.Assassination of Tantamukta Samiti Chairman at Shegaon
सविस्तर असे की, शेगाव येथील तंटा मुक्त समिती चे अध्यक्ष श्री महेश घोडमारे समाज सेवक असून तो खाजगी क्षेत्रात तो जातीचे प्रमाणपत्र , उत्पन्नाचा दाखला , असे विविध कामे तो करून जनतेची सेवा करीत होता त्याच बरोबर तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील करीत होता.

विशेष म्हणजे महेश हा सर्व कामात तरबेज असून तो गावात तसेच गाव परिसरात त्याची चांगली प्रतिमा होती . परंतु गेल्या तीन ते चार दिवसापासून महेश हा आपल्या कामाकरीता बाहेर गेला होता तो घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी अधिक चौकशी केली शिवाय काल २२ तारखेला त्यांच्या भावाने पोलीस स्टेशन शेगाव येथे माझा भाऊ हरविला असल्याची लेखी तक्रार दिली तेव्हा येथील पोलीस कर्मचारी देखील आपल्या कामाला लागले दरम्यान आज सकाळी त्यांच्या भाऊ याने अधिक माहिती घेतली असता त्याचा भाऊ मेसा येथून दुसऱ्याच्या दूचाकी बसून वरोरा येथे रवाना झाला असल्याची माहिती समोर आली शिवाय ही गाडी मेसा समोरील जंगलात उभी असल्याची खात्री काही लोकांनी दिली यांच्या आधारे घटना स्थळ गाठले असता झुळपाड त्याची चप्पल , रक्त , रक्त बांबाळ असलेले लोखंडी रॉड , व झुळपा आड प्रेत आढळून आले तेव्हा या घटनेची माहिती पोलिसांना देताच येथील ठाणेदार श्री अविनाश मेश्राम यांच्या ताफ्यासह सर्व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून तपास चक्र वेगाने फिरवून आरोपींना अटक केली

पुढील तपास शेगाव स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्रम यांच्या मार्गदर्शनात कर्मचारी करीत आहेत. घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment