चंद्रपूर :- शीर नसलेल्या 22 वर्षीय तरुणीच्या मृतदेहाच्या रहस्यमयी प्रकरणात अनेक नवीन बाबी पुढे येत असून सदर प्रकरणात अल्पवयीन मुलीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अपमानाचा बदला घेण्यासाठी सदर हत्याकांड घडवुन आणले अशी कबुली अल्पवयीन मुलीने दिली आहे.
आज सायंकाळी दाताला मार्गावरील रामसेतू पुलाच्या खालील भागात सदर युवतीचे शीर मिळाले.The head of the 22-year-old girl was finally found under the Ramsetu bridge
आरोपीने त्या जागेवर शीर फेकले असल्याचे सांगताच स्थानिक गुन्हे शाखेने 2 गोताखोरांच्या मदतीने सदर शीर शोधून काढले.
कापडाच्या थैलीत असलेले शिर ओढणीने व अनेक कपड्यांच्या गुलदस्त्यात बांधून त्या पुलावरून खाली फेकले असल्याची माहिती मिळाली आहे.
या प्रकरणात मृतक युवतीला नेणारा तो युवक कोण? चंद्रपुरातील प्रतिष्ठित घराण्याचा किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेला युवक तर नाही अशी चर्चा शहरात जोमात सुरू आहे.
युवतीची काय पार्श्वभूमी होती यावर मात्र पोलीस प्रशासनाने कमालीचे मौन बाळगले आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल ने या प्रकरणात उत्तम कामगिरी बजावीत तात्काळ आव्हानात्मक गुन्ह्याचा उलगडा केला.
0 comments:
Post a Comment