Ads

पॅरामिलिटरी फोर्स मध्ये विशेष सवलत देऊन उमेदवारांना भरती प्रक्रियेत सामावून घ्या .

चंद्रपूर : पॅरामिलिटरी फोर्सच्या भरती प्रक्रियेला कोरोणा महामारीमध्ये ३ वर्षे लागली. ज्यामध्ये अनेक उमेदवारांनी वयोमर्यादा ओलांडली आहे. या उमेदवारांना विशेष सवलत देऊन प्राधान्याने नियुक्ती करण्याची मागणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर loksabha यांनी लोकसभेत सोमवारी केली.
भारत सरकारने 2018 मध्ये पॅरामिलिटरी फोर्समध्ये 60210 कॉन्स्टेबलची भरती केली होती. 21 जानेवारी 2021 रोजी अंतिम निवड यादीत तीन वर्षानंतर केवळ 55000 विद्यार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

उर्वरित पदांसाठी ८ फेब्रुवारी २०२१ पासून अन्यायग्रस्त उमेदवारांचे जंतरमंतर नवी दिल्ली येथे आंदोलन सुरू असून, या न्यायालयीन आंदोलनाकडे केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे. आता या अन्यायकारक उमेदवारांनी संविधान चौक, नागपूर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे.Include candidates in the recruitment process with special concessions in Paramilitary Force *

या उमेदवारांच्या मागणीची दखल घेऊन पॅरामिलिटरी फोर्सच्या भरतीत विशेष सवलत देऊन प्राधान्याने नियुक्ती करण्याची मागणी चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभेत सोमवारी केली.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment