चंद्रपुर :-Cipco Pharma company ला 500 हेक्टर जमीन देण्यात आली आहे.मात्र 1994 साली कवळीमोल भावाने जमीन घेण्यात आली ,मात्र 28 वर्ष लोटून सुद्धा अजूनही कुठलाही प्रकल्प उभा झाला नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच मोठ प्रमाणात नुकसान झालं.त्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आपण कुठलाही प्रकल्प उभारू देणार नाही,अशी भूमिका घेतली आहे.Approve the new project only after agreeing to the demands of the Nippon Trendro project affected farmers.
यावेळी आपल्या जिल्ह्यात आता सुरू होणाऱ्या प्रकल्पाच्या नियमानुसार शेतजमिनीचा मोबदला देण्यात यावा.प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला नोकरी देण्यात यावी.प्रकल्पग्रस्त गावाना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी भरीव निधी देण्यात यावी. सांस्कृतिक आणि इतिहासिक वारसा जोपासत याव्यात,अन्यथा आमच्या शेतजमिनी वापस करण्यात याव्या Otherwise return the farmland to the farmers. अश्या मागण्या करण्यात आल्या.
पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार जिल्हाधिकारी गुल्हाने साहेब,उपविभागीय अधिकारी शिंदे,अन्नदाता एकता मंच अध्यक्ष संदिप कुटेमाटे ,सभापती वासुदेव ठाकरे,संस्थापक अनुप कुटेमाटे, मधुकर सावणकर,दिलीप चौधरी,अक्षय कुटेमाटे,परशुराम कुटेमाटे,गोसाई काकडे, प्रेमदास वेलेकर, नत्थु कुटेमाटे,पुंडलिक ढवस आणि पिपरी,कोची, तेलवासा, ढोरवासा, चिरादेवी आणि विजासान गावातील प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment