भद्रावती (जावेद शेख):- चंद्रपुर येथील डेबूजी सावली वृद्धाश्रम देवाडा येथे भद्रावती शहर काँग्रेस अध्यक्ष सुरज गावंडे यांनी आपला वाढदिवस साध्यापणे वृद्धाश्रमतील वृध्दांन सोबत केक कापून साजरा केला. तसेच वृद्धाश्रमतील वृद्धमहिला जे भोपाल निवासी आहे त्याचा ,सुनील हेमके, प्रमोद नागोसे यांचा वाढदिवसही मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.या डेबू सावली वृद्धाश्रमात एकूण 28 लोक राहतात. वृद्धाश्रमात त्यांच्या सोबत वाढदिवस स्मृतिदिन ,लग्नाचा वाढदिवस या सारखे कार्यक्रम अनेक लोक साजरा करत राहतात असे सांगितले जाते. यानंतर आमदार प्रतिभा धानोरकर यांनी डेबू सावली वृध्दाश्रमाला भेट देऊन माहिती घेतली, काही मदत लागल्यास सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.यावेळी डेबू सवलीचे सचिव यांनी आमदार प्रतिभा धानोरकर यांचा पुस्तक व मानचिन्ह देऊन सत्कार केला.यावेळी नगराध्यक्ष अनिल धानोरकर,नगरसेवक, प्रशांत झाडे, किशोर हेमके, अक्षय बोंडे, निखिल राऊत, सुधीर खोब्रागडे , तन्वीर शेख , गोलू कुरेशी,विजय पारधी,बापू भरणे, अनिल वरजुरकर,रवी उपगलनवार,जावेद शेख, आदिल शेख, निखिल गुंडावार आदि लोक उपस्थित होते.
Home
Uncategories
डेबू सावली वृद्धाश्रम देवाडा येथे काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज गावंडे यांनी केला आपला वाढदिवस साजरा
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
0 comments:
Post a Comment