Ads

*कोंढेगाव येथे वाघाच्या हल्ल्यात गो-हा जखमी*


भद्रावती,दि.१०(तालुका प्रतिनिधी):-

      भद्रावती तालुक्यातील व ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या कोंढेगाव (माल) येथील आदिवासी शेतकरी रवींद्र चौखे यांचा गो-हा वाघाच्या हल्ल्यात जखमी झाल्याने कोंढेगाव परिसरात ग्रामस्थांमध्ये दहशत पसरली आहे. 
      दि.९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान रवींद्र चौखे आपल्या शेताला लागून असलेल्या अनिल जांभुळे ‌यांच्या  शेतात गुरे चारत असताना पट्टेदार वाघाने अचानक हल्ला केला. त्यात त्यांचा एक गो-हा जखमी झाला. गो-ह्यावर हल्ला केल्याचे लक्षात येताच कळपातील एका बैलाने वाघावरच हल्ला चढविला.तसेच तेथे उपस्थित गुराख्यांनी आरडाओरड करताच वाघाने तेथून पळ काढला. वाघाच्या हल्ल्यात गो-हा जखमी झाल्याने रवींद्र चौखे यांचे जवळपास २५ ते ३० हजारांचे नुकसान झाले आहे.वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करुन परिसरातील नागरिकांना भयमुक्त करावे. तसेच रवींद्र चौखे यांना तात्काळ नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment