Ads

*हंसराज अहीर यांच्या पाठपुराव्याने अखेर धोपटाळा कोळसा खाण प्रकल्प मार्गी*


चंद्रपूर:-
धोपटाळा कोळसा खाण प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना जमीनीचा मोबदला, नोकरी तसेच स्थानिकांना रोजगारा संबंधी पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांनी सातत्याने चर्चा, बैठका व पाठपुरावा केल्यामुळे धोपटाळा प्रकल्पग्रस्तांना मोबदला व नोकऱ्या  मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संबंधीत प्रकल्पग्रस्तांनी दि. 12 ऑक्टो. रोजी अहीर यांच्या निवासस्थानी जावून त्यांचे स्वागत केले. त्यांच्या प्रयत्नामुळे न्याय मिळाल्याने त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त केली व आभार मानले.
याप्रश्नी दि. 23 सप्टेंबर रोजी या प्रश्नाला घेऊन हसराज अहीर यांनी वेकोलि नागपूर मुख्यालयात बैठकीचे आयेजन करीत.धोपटाळा खाणीस विनाकारण विलंब होत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. यावेळी महिनाभरात हा प्रश्न मार्गी लावा अन्यथा आंदोलनात्मक भुमिका घेवू असा इशारा दिला होता.  त्यानुसार हंसराज अहीर यांच्या माध्यमातून अखेर हा प्रश्न मार्गी लागला आहे. सास्ती, धोपटाळा, कोलगांव, बाबापुर, मानोली या गावातील शेतकऱ्यांची  870 हेक्टर शेतजमीन वेकोलि बल्लारपूर क्षेत्रातील धोपटाळा युजी टु ओसी या प्रकल्पाकरीता सन 2015 मध्ये सी.बी. एक्ट  1957 च्या सेक्शन 9 च्या अधिसुचनेनुसार संपादीत करण्यात आली होती. या प्रकल्पात सुमारे 175 कोटी रूपये   प्रकल्पग्रस्तांना प्राप्त होणार असुन 1080 नौकऱ्या  सुध्दा मिळणार आहेत. त्यामुळे या प्रकल्पग्रस्तांना फार मोठा आर्थिक लाभ उपलब्ध होईल.
पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्राी हंसराज अहीर यांच्या भगीरथ प्रयत्नातुन सन 2012 मध्ये या प्रकल्पाला 6 लाख व 10 लाख रूपये प्रति एकर दर मंजुर झाला होता परंतू काॅस्ट प्लस च्या तांत्राीक कारणामुळे हा प्रकल्प रखडला व आर्थिकदृष्ट्या वेकोलिसाठी लाभकारक ठरत नसल्याने हा प्रकल्प रद्द करण्याच्या मनस्थितीमध्ये वेकोलि प्रबंधन होते परंतू हंसराज अहीर यांनी याची गांभीर्याने दखल घेवून कोल मंत्रालय, कोल इंडीया व वेकोलि प्रबंधनाशी सातत्याने पाठपुरावा करीत व समन्वय साधुन सन 2018 मध्ये हा प्रकल्प कोल बोर्ड मधुन पास करून घेतला होता हे विशेष.
या प्रकल्पातील कोळसा खरेदी प्रश्नासंदर्भात महाजेनको, एन.टी.पी.सी. आणि मध्य प्रदेशातील एम.पी.सी.एल. यांचेशी केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाने कोळसा खरेदीबाबत अहीर तसेच वेकोलि प्रबंधन, सिआयएल, कोल मंत्रालय यांचे मध्यस्थिने एम.पी.सी.एल.वगळता अन्य दोन्ही करारनामे झाले होते. परंतु एम.पी.सी.एल. ने या करारावर स्वाक्षरी करण्यास दिरंगाई केल्याने मागील 9 वर्षांपासून प्रकल्पग्रस्त आर्थिक मोबदल्यापासून वंचित होते.
महाजेनको ने त्यांच्या वाट्याचा कोळसा खरेदी करावा असा सुध्दा प्रयत्न झाला परंतू राज्य सरकारच्या निष्क्रीयतेमुळे हा करार होवू शकला नाही. शेवटी केंद्रीय कोळसा मंत्री  व कोळसा राज्यमंत्री यांचे माध्यमातून अहीर यांनी आग्रही भूमिका घेतल्याने एमपीसीएलने करारनाम्यावर स्वाक्षरी केली त्यामुळे मोबदल्याचा मार्ग मोकळा होवून लवकरच धोपटाळा प्रकल्पग्रस्तांना मोबदला व  नौकऱ्याही  देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे संबंधित प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी हंसराज अहीर यांची प्रत्यक्ष भेट घेत त्यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार केला व आभार मानले. यावेळी भाजपा नेते खुशाल बोंडे, मधुकर नरड, किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष राजू घरोटे, जि.प. सभापती सुनिल उरकुडे, अॅड प्रशांत घरोटे, सरपंच पुरुषोत्तम लांडे, अक्षय निब्रड, किशोर कुडे, प्रशांत साळवे यांचेसह अन्य प्रकल्पग्रस्त बांधव उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment