Ads

गरिब परिस्थितीला मात करून ग्लोरिअस भद्रावती चा दीक्षांत ठरलाआय आय टी साठी पात्र


भद्रावति तालुका प्रतिनिधी:-

नुकत्याच जाहीर झालेल्या जेइई ऍडव्हान्स परीक्षेच्या निकालात भद्रावती ग्लोरिअस अकादमीचा विद्यार्थी दीक्षांत बबन आसुटकर आय आय टी साठी पात्र ठरले आहेत. 

दीक्षांतचे वडील मजुरी चे काम करतात व आई गृहिणी आहे ,दीक्षांत ने खूप गरीब परिस्थितीतुन अभ्यास करुन आई आई टी ची परीक्षा उत्तीर्ण केलेले आहे, दीक्षांतआसुटकर आपले आई वडीला सोबत डोलारा भद्रावती येथे राहत असून त्याचे घर फक्त एक रूम चे असून सुद्धा त्याने परिस्थितीला मात करून आई आई टी च्या परीक्षेत 1774 रँक पटकाविला आहे . ते आपल्या यशाचे श्रेय ग्लोरिअस अकादमी भद्रावतीच्या शिक्षक, व्यवस्थापक आणि आपल्या आई वडिलांना दिले आहेत. त्याने जेइइ मेन्स व जेइइ ऍडव्हान्स प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment