Ads

मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त भद्रावती येथे आरोग्य शिबिर तथा नेत्र तपासणी शिबीर व शिव संपर्क अभियान संपन्न


भद्रावती तालुका प्रतिनिधी :-
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री मा. श्री उद्धव साहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आरोग्य शिबिर तथा नेत्र तपासणी शिबीर व शिव संपर्क अभियान मा. नितीन भाऊ मते जिल्हाप्रमुख चंद्रपूर, यांच्या मार्गदर्शनाने व श्री रमेश भाऊ मेश्राम उपजिल्हाप्रमुख भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्र,श्री नरेश भाऊ काळे तालुका संघटक भद्रावती आणि नंदू भाऊ पढाल शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक भद्रावती यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहे याचेच औचित्य साधून दिनांक 01ऑक्टोंबर 2021 पासून आरोग्य तपासणी शिबीर तथा नेत्र तपासणी शिबीर व नेत्र तपासणी करून चष्मे वाटप आणि शिव संपर्क अभियान भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागात 32 गावात सुरू करण्यात आले आहे, अभियान दिनांक 3 नोव्हेंबर 2021 पर्यंत भद्रावती तालुक्यातील रोज वेगवेगळ्या गावात सुरू राहणार आहे या अभियानांतर्गत नागरिकांना आरोग्य सुविधा व नेत्र तपासणी करून त्यांच्या नंबर नुसार चष्मे देण्यात येत आहे. या शिबीराचा भद्रावती तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आवाहन श्री नंदू पढाल शिवसेना शहर प्रमुख तथा नगरसेवक भद्रावती यांनी केले आहे. या अभियानासाठी श्री राजू भाऊ सारंगधर नगरसेवक, सौ माया नारळे महिला उपजिल्हा संघटिका, सौ कल्पना भुसारी महिला तालुका संघटिका, सौ माया टेकाम महिला शहर संघटिका, श्री बाळाभाऊ शिरसागर उपतालुकाप्रमुख, श्री आशिष ठेंगणे प्रसिद्धीप्रमुख, श्री घनश्याम आस्वले युवा सेना तालुका समन्वयक, श्री गौरव नागपुरे युवा सेना शहर समन्वयक, श्री राहुल खोडे, सतीश आत्राम, येशु आरागी, पांडे ताई, साव ताई, जुनारकर ताई, आत्राम ताई, आगलावे ताई, शिव गुड मल, डंभारे ताई, मयूर शेदामे, इत्यादी शिवसैनिक परिश्रम घेत आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment