Ads

चंद्रपूर जिल्हयातील 63 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण





चंद्रपूर जिल्हयातील 63 हजारांवर नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण



Ø सध्या अॅक्टिव रुग्णांची संख्या 10

Ø कंटेनमेंट झोनमध्ये आरोग्य पथकामार्फत तीन हजारावर घरांचे सर्वेक्षण

Ø 49 नमुने प्रतीक्षेत


चंद्रपूर,दि.31 मे: जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत 12 रुग्ण कोरोना आजारातून बरे होऊन त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चंद्रपूर येथे विलगीकरण कक्षात एक रुग्ण भरती असून 9 रुग्णांना कोविड केअर सेंटर वन अकादमी चंद्रपूर येथे भरती करण्यात आलेले आहेत. जिल्ह्यातील एकूण ॲक्टिव रुग्णांची संख्या 10 असून या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

कोविड-19 संक्रमित रुग्णांच्या संपर्कातील संशयित व्यक्तींना शोधून त्यांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात व गृह अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. प्रतिबंधीत क्षेत्र (कंटेनमेंट झोन ) मध्ये सर्व कुटुंबातील लोकसंख्येचे दैनंदिन 14 दिवस आरोग्य पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात येत आहे. तसेच, आयएलआय, सारीचे रुग्ण शोधून त्यांना उपचाराखाली आणण्यात येत आहे.

जिल्ह्यात एकूण 10 कंटेनमेंट झोन कार्यान्वित असून सदरील झोनमधील रुग्णांचा व इतर सर्व रुग्णांचा नियमित पाठपुरावा सुरू आहे. 10 कंटेनमेंट झोनमध्ये 71 आरोग्य पथकामार्फत 3 हजार 151 घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 12 हजार 69 सर्वेक्षित लोकसंख्या आहे.तर,आयएलआयसारीचे 11 नमुने घेतले असून आयएलआयसारीच‌े 10 नमुने निगेटिव्ह आले आहेत.तरएक नमुना प्रतीक्षेत आहे.

जिल्ह्यातील कोविड-19 ची सर्वसाधारण माहिती पुढील प्रमाणे आहे. एकूण 943 स्वॅब नमुने तपासणी पाठविले होते. यापैकी पॉझिटिव्ह 22 नमुने असून निगेटिव्ह 872 आहे तर 49 नमुने प्रतीक्षेत आहेत.

दिनांक 31 मे रोजी एकूण जिल्ह्यातील संस्थात्मक अलगीकरणात 4 हजार 293 नागरिक आहेत. यापैकी ग्रामस्तरावर 3 हजार 427 नागरिकतालुकास्तरावर 460 नागरिक तर जिल्हास्तरावर 406नागरिक संस्थात्मक अलगीकरणात आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत 72 हजार 854 नागरिक जिल्ह्यामध्ये दाखल झाले आहेत. तसेच,63 हजार 654 नागरिकांचे गृह अलगीकरण पूर्ण झाले असून हजार 200 नागरिकांचे गृह अलगीकरण सुरू आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment