Ads

नागभीड तालुक्यातील कोजबी चक येथे रक्तदान शिबिर संपन्न.




नागभीड तालुक्यातील कोजबी चक येथे रक्तदान शिबिर संपन्न.

  चंद्रपूर :-
  स्वामी विवेकानंद पतसंस्था, नागभीड व कोजबी युवा फाऊंडेशन , कोजबी चक यांच्या संयुक्त विद्यमाने कोजबी चक येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. संपुर्ण देशात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव सुरु असल्याने केवळ भितीपोटी रक्तदात्यांची संख्या घटली. त्यामुळे राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी रक्तदान करण्यासाठी जनतेला आवाहन केले होते. 
       या आवाहनाला प्रतिसाद देत शुक्रवारी नागभीड तालुक्यातील कोजबी चक येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात झालेल्या या रक्तदान शिबिराचे उद्घाटन कोजबी चे पोलीस पाटील नारायण पर्वते यांनी केले. यावेळी स्वामी विवेकानंद पतसंस्थेचे अध्यक्ष व जि.प.सदस्य संजय गजपुरे , भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष होमदेव मेश्राम, सरपंच रविन्द्र पर्वते, फाऊंडेशनचे संयोजक विशाल गोपाले , उपसरपंच दिपक भेंडारे, ब्रम्हपुरी रक्त सेवा समितीचे अध्यक्ष स्वप्निल अलगदेवे , सचिव प्रा.सुयोग बाळबुद्धे , सदस्य प्रा.विशाल लोखंडे, पतसंस्थेचे संचालक मनोज कोहाट यांची उपस्थिती होती.
        रक्तपेढी गडचिरोली च्या सहकार्याने झालेल्या या शिबिरात ३१ जणांनी रक्तदान केले तर २७ जणांनी रक्तदानासाठी सदैव उपलब्ध असल्याची नोंद केली.  रक्तदात्यांना यावेळी संस्थाध्यक्ष संजय गजपुरे, रक्तपेढी गडचिरोलीचे जनसंपर्क अधिकारी सतिश तडकालावार व रक्तसंक्रमण अधिकारी डाॅ.किशोर ताराम यांचे हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. 
          या रक्तदान शिबिराला नागभीडचे तहसिलदार चव्हाण व नायब तहसिलदार भांगरे यांनी सदिच्छा भेट दिली. शिबिरस्थळी असलेली स्वच्छता व सोशल डिस्टेन्सिंगचे पालन होत असल्याबद्दल तहसिलदार चव्हाण यांनी कौतुक करीत समाधान व्यक्त केले. 
      या शिबिराच्या यशस्वितेसाठी विशाल गोपाले, रविंद्र पर्वते ,ढुमदेव देशमुख , प्रमोद मस्के, भाष्कर राऊत , विनोद गिरडकर तसेच आरोग्य केंद्राच्या परिचारिका, आशा वर्कर , फाऊंडेशनचे सदस्य व ग्रा.पं. सदस्यांनी सहकार्य केले.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment