Ads

जिल्ह्यातील निराश्रितांची उपासमार होऊ नये म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवारांकडून होणार धान्य वाटप!

जिल्ह्यातील निराश्रितांची उपासमार होऊ नये म्हणून पालकमंत्री विजय वडेट्टीवारांकडून होणार धान्य वाटप!



चंद्रपूर,दि.31 मार्च: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्यात जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वत्र कडकडीत बंद आहे. अशावेळी गरजवंतांचीकष्टकऱ्यांची उपासमार होऊ नये म्हणून राज्याचे इतर मागास बहुजन कल्याणमदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नाविजय वडेट्टीवारयांच्याकडून चंद्रपुर जिल्ह्यातील गरजू व गरीब कुटुंबाना 15 दिवस पुरेल इतके धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप येत्या 5 एप्रिलपासून करण्यात येणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत अमलात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना अंतर्गत गेले काही दिवस जिल्ह्यात संचारबंदी असल्यामुळे मजुरांच्या हाताला काम नाहीलहान व्यवसाय करणारे कारागीर व दुकानदार यांचा रोजगार बंद झाल्यामुळे त्यांना घरीच बसून राहावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाबाळांची उपासमार होऊ नयेत्यांना पोटभर अन्न उपलब्ध व्हावे म्हणून तसेच ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही अशा गरजू लोकांना पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांच्याकडून मोफत अन्न धान्य व जीवणावश्यक वस्तूचे वाटप संबधित तहसील कार्यालयाच्या माध्यमातून पालकमंत्र्यांचा मतदार क्षेत्र असलेल्या ब्रम्हपुरीसावली व सिंदेवाही या तालुक्यासाठी 15 हजार बॅग व जिल्ह्यातील उर्वरीत तालुक्यासाठी 15 हजार बॅग अशाप्रकारे 30 हजार बॅगचे वाटप करण्यात येणार आहे. हे साहित्य वाटप करण्यासाठी पालकमंत्र्यांनी संबधित तहसिल कार्यालयाचा कर्मचारीग्रामसेवक व काँग्रेसचे दोन प्रमुख कार्यकर्त्यांची तसेच चंद्रपूर शहरासाठी तहसिल कार्यालयाचा कर्मचारी व महाविकास आघाडी प्रमुख तीन कार्यकत्याची टीम तयार करण्यात आलेली आहे.ब्रम्हपुरीसिंदेवाहीसावली यासह जिल्ह्यातील तहसील कार्यालयात जीवनावश्यक धान्याचे किट उपलब्ध करण्याचं काम सुरु झाले असून येत्या 5 एप्रिल पासून त्याचे वाटप करण्यात येणार आहे. धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करताना शासनामार्फत लागू असलेले कलम 144 चे पालन व्हावे म्हणून गरजूवंतांची यादी तयार करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरु आहे.

Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment