Ads

डॉ.विद्याधर बन्सोड यांच्या ६ पुस्तकांचे रविवारी लोकार्पण

चंद्रपूर/प्रतीनिधी:

चंद्रपुरातील व्यासंगी लेखक, समीक्षक आणि कवी डॉ. विद्याधर बन्सोड यांच्या ललितलेखसंग्रह, वैचारिक, कादंबरी, बालकवितासंग्रह आणि स्वकथन अश्या साहित्यप्रकारातील एकूण सहा पुस्तकांचे रविवार दिनांक २७ जानेवारी २०१९ ला सकाळी ११.३० वाजता स्थानिक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयात सूर्यांश साहित्य आणि सांस्कृतिक मंच चंद्रपूर तर्फे लोकार्पण आणि चर्चा आयोजित करण्यात आली आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या अध्यक्षतेखाली, प्रसिद्ध कादंबरीकार आणि लेखक डॉ. रवींद्र शोभणे पुस्तकांचे लोकार्पण करतील.

 याप्रसंगी सरदार पटेल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश इंगोले प्रामुख्याने उपस्थित राहतील. टोला,तू, होरपळ, दलित साहित्याचे वैचारिक अधिष्ठान, चिऊ आणि मुक्काम पोस्ट तेढा अशी पुस्तकांची नावे असून सहा वेगवेगळ्या साहित्यप्रकारातील या पुस्तकांवर नागपूर विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख व वैचारिक लेखक डॉ. शैलेंद्र लेंडे, चंद्रपूरचे सुप्रसिद्ध समीक्षक प्राचार्य डॉ. श्याम मोहरकर , दलित साहित्याचे अभ्यासक आणि साहित्यिक डॉ. इसादास भडके, कवी डॉ. धनराज खानोरकर, आष्टी येथील युवा समीक्षक डॉ. राजकुमार मुसणे उपरोक्त पुस्तकांवरती चर्चा करतील. 

एकत्र एकाच लेखकाच्या सहा पुस्तकाचे प्रकाशन होणे ही साहित्यक्षेत्रासाठी आनंदाची बाब आहे. डॉ. विद्याधर बनसोड यांच्या साहित्यावर प्रेम करणाऱ्यानी तसेच सूर्यांशच्या सर्व रसिक, कवी, लेखक, कलावंत आणि नागरिकांनी लोकार्पण आणि चर्चेला उपस्थित राहण्याचे आवाहन सूर्यांशच्या वतीने करण्यात आलेले आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment