Ads

BIT शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्याचा आत्मदहनाचा इशारा

कर्मचाऱ्यांचा आरोप : ३१ जानेवारीला कुटुंबासह आत्मदहन

 चंद्रपूर/प्रतिनिधी:


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, शिक्षणमहर्षी अँड.बाबासाहेब वासाडे यांच्या शिक्षण संस्थेतील गैरप्रकार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. बाबासाहेब वासाडे यांच्या शिक्षण संस्थेतील तीन कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली आपबिती सांगितली. पैसे घेऊन नौकरीचे आश्वासन देणे, खोटा राजीनामा घेऊन नोकरीवरून काढणे आणि कर्मचाऱ्यांचे वेतन न देणे आदी गंभीर आरोप कर्मचाऱ्यांनी पत्रकार परिषेदेत अँड.बाबासाहेब वासाडे याच्यावर केले.

यातील गौतम तोडे आणि शमाबाई तोडे या पीडित दांपत्याने तर ३१ जानेवारीला आत्मदहन करणार असल्याचेही यावेळी जाहीर केले.अँड, वासाडे अध्यक्ष असलेल्या कृषी जीवन विकास प्रतिष्ठानद्वारे संचालित कर्मवीर विद्यालयात गौतम ताडे सन १९९१ ते २००१ पर्यंत शिक्षक म्हणून कार्यरत होते. संस्थेतर्फेच त्यांनी बीएडचे शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी त्यांना कायमस्वरूपी सहायक शिक्षण म्हणून घेणार, असा दाखलासुद्धा देण्यात आला. मात्र १९९८ ला त्यांना डावलून एस.एस. गायकवाड यांना सहायक शिक्षण म्हणून रुजू करण्यात आले. २००१ नंतर त्यांना शाळेतच येण्यास मनाई केली. त्याकाळात नोकरीसाठी अँड.वासाडे यांना तोडे यांनी ८० हजार रुपये दिले होते. तोडे यांनी माहितीच्याअधिकारात भरतीचे रोस्टर मिळविले.तेव्हा गायकवाड यांची नियुक्तीच बेकायदेशीर असल्याचे उजेडात आले.अनुसूचित जमातीचा शिक्षकाऐवजी नियमबाहयय रित्या , दुसऱ्या प्रवर्गातील शिक्षकाची नियुक्‍ती वासाडे यांनी केली.
ballarpur institute of technology साठी इमेज परिणाम
२०१६ मध्ये तोडे यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले. तेव्हा तत्कालीन प्रभारी शिक्षणाधिकारी नीलेश पाटील यांनी मध्यस्थी केली. वासाडे आणि तोडे यांच्यात समझोता झाला.नुकसानभरपाई देण्याचे मुद्रांकावर लिहून दिले. परंतु आजतागायत त्याचे पालन त्यांनी केले नाही असे तोडे यांनी सांगितले.संबंधित विभागही उडवाउडवीचे उत्तर देत आहे. घरी प्रचंड आर्थिक टंचाई आहे. त्यामुळे आता आम्ही पती-पत्नीने ३१ जानेवारीला वासाडे यांच्या घरासमोरच आत्मदहन करण्याचा निर्णय घेतला, असे त्यांनी यावेळी सांगितले.

जबाबदारी संस्थाध्यक्षाची

बीआयटी, बामणी येथे सतीश लांजेवार लीपिक म्हणून कार्यरत आहे. मे २०१८ पासून त्यांना वेतन मिळाले नाही. संस्थाध्यक्ष वासाडे उडवा उडवीची उत्तरे देतात, असे त्यांनी सांगितले. सध्या पत्नीचा हात मोडला आहे. आर्थिक विवंचनेत आहे. त्यामुळे आत्महत्येशिवाय पर्याय नाही. माझे शिल्लक दोन लाख रुपये देण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वासाडे यांना पत्र दिले. त्याचीसुद्धा दखल घेतली नाही. या परिस्थिती कोणतेही टोकाचे पाऊल उचलले तर त्याची जबाबदारी संस्थाध्यक्षांची राहील, असे सतीश लांजेवार आणि नंदा लांजेवार या दांपत्याने दिला,
खोटा राजीनामा 
BIT कर्मचारी संघटनेचा उपाध्यक्ष असताना थकीत वेतनासाठी आंदोलन केले. संस्था अध्यक्षांनी सहकार्य करा, अशी विनंती केली. मात्र, त्यानंतर वेतन दिले नाही. बेमुदत उपोषण सुरू केले. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी रामनगरचे ठाणेदार अशोक कोळी, संस्थेचे कार्याध्यक्ष संजय वासाडे यांच्या मध्यस्थीने उपोषण स्थगित केले. यादरम्यान माझा खोटा राजीनामा तयार केला. राजीनामा स्वीकृत झाल्याची माहिती मला पाठविली, असा आरेप देवेंद्र सायसे यांनी यावेळी केला.
संस्था अध्यक्ष व कर्मचाऱ्यांची व्हाईस रेकॉर्डिंग 
BIT संस्था अध्यक्ष व संस्थेतील कर्मचाऱ्यांची एक व्हॉइस रेकॉर्डिंग खबरबातच्या हाती लागली या संस्थेचे कर्मचारी हे राष्ट्रपतीकडे इच्छामरणाची परवानगी मागणार असल्याचे या रेकॉर्डिंगमध्ये बोलल्या जात आहे शिवाय वारंवार पगाराचे पैसे मागू नही संस्थाध्यक्ष हे पैसे देत नसल्याने स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करणार असल्याचे या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये बोलण्यात येत आहे. सोबतच संपूर्ण बी.आय.टी संस्था देखील कोणते कोणते चुकीच्या मार्गाने काम करत आहे. याचा खुलासा भ्रष्टाचाराच्या पुराव्यासह माध्यमांसमोर आणल्याचे देखील बोललेल्या गेले आहे. सॊबतच बाबासाहेब वासाडेंनी अनेकांकडून पैसे घेऊन नौकरीचे आमिष दाखविले मात्र सर्वांच्या तोंडाला पाने पुसली.सोबतच वासाडे हे आपल्या संस्थेत दरवर्षी औरा नावाचा सांस्कृतिक कार्यक्रम घेतात त्यासाठी ५० लाख रुपये खर्च केल्या जाते,मोठमोठे मेळावे घेतल्या जाते त्यासाठी संपूर्ण सोइ सुविधा पुरविण्यासाठी वासाडे हे तयार असतात मात्र आपल्याच संस्थेतील कर्मचाऱ्यांचे पैसे देत नसल्याने आमच्यावर आत्मदहनाची वेळ येत आहे ,या आधीच अडचणीत सापडलेले बाबासाहेब वासाडे आता कर्मचाऱ्यांनी केलेल्या तक्रारीमुळे आणखी कचाट्यात सापडले आहे, हे संपूर्ण व्हाईस रेकॉर्डिंगमध्ये सांगितल्या जात आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment